डॉक्टरांची handwriting इतकी विचित्र का असते?

तपासून झाल्यावर डॉक्टर आपल्याला सांगतात कोणत औषध घ्यायचं कधी घ्यायचं आणि याचवेळी ते काही बाहेरची औषधे देखील आपल्याला सांगतात जी आपल्याला मेडिकल मधून घ्यावी लागतात. अश्या वेळेस डॉक्टर एका कागदावर आपल्याला औषधांची नाव लिहून देतात. त्या कागदावर काय लिहिलंय हे आपल्याला कधीच वाचता येत नाही. या कागदावर किंवा प्रिस्क्रिप्शनवर डॉक्टर इतक्या भरभर आणि विचित्र अक्षरात लिहितात की खुद्द शेक्सपिअरची देखील वाचताना दमछाक व्हायची. हे डॉक्टरांचं अक्षर मेडिकलवाल्याला मात्र बरोबर कळत. तर तुमच्याही मनात प्रश्न येत असेल की हे डॉक्टर लोक एवढे सुशिक्षित मग यांच अक्षर इतका गलिच्छ का? तर आज याचचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

doctors-handwriting-marathipizza01

स्रोत

=====

=====

खरतरं या मागचं कारण ऐकुन तुम्हाला देखील हसू येईल. आपल्याला पडलेला हाच प्रश्न जेव्हा एका डॉक्टरला विचारण्यात आला तेव्हा त्याने दिलेलं उत्तर हेच या प्रश्नाचं वैध उत्तर मानायला हरकत नाही, करण ते पटण्यासारखं आहे. हा डॉक्टर म्हणतो की,

शाळेमध्ये मी खूप सुरेख अक्षर काढायचो. मला हस्ताक्षर स्पर्धेत बक्षीस देखील मिळालं होतं. परीक्षेमध्ये तर मी अधिक मन लावून शक्य तितकं नीटनेटक आणि सुंदर अक्षर काढायचो. शाळेतले सगळे शिक्षक इतर विद्यार्थ्यांना माझ्यासारखं अक्षर काढण्यास सांगायच्या. त्यामुळे मला माझ्या अक्षराचा अभिमान होता. परंतु मी डॉक्टरकी करायची ठरवली आणि माझ्या अक्षराला जी उतरती कळा लागली ती कायमचीच ! डॉक्टरकीची कोणतीही परीक्षा घ्या तुम्हाला कमी वेळात भलीमोठी उत्तरे लिहावी लागतात. हेच कारण होतं की माझ अक्षर खराब झालं. पेपर सोडवायला वेळ कमी असायचा त्यातच उत्तर पूर्ण लिहावी लागायची, मुख्य म्हणजे काहीही फेकून उत्तर लिहिलेलं चालायचं नाही, उत्तर अगदी अचूक हव असायचं, त्यामुळे अक्षराकडे लक्ष देण्यास वेळ मिळायचा नाही. जे मनात यायचं ते वाऱ्याच्या गतीने लिहिण्याशिवाय पर्याय नसायचा. आणि सगळ्याच परीक्षेमध्ये ही गत असल्यामुळे पटापट लिहायची सवय लागून गेली. त्यामुळे मी काय लिहितो ते फक्त मलाच कळतं. आणि हे फक्त माझ्याबरोबरचं नाही तर डॉक्टर झालेल्या प्रत्येकाबरोबर घडलेलं आहे आणि जोवर लिखाणाची परीक्षा आहे तोवर असंच घडत राहणार.

 

doctors-handwriting-marathipizza02

स्रोत

आता तुमच्याही लक्षात आलं असेल की या डॉक्टर वर्गाच्या या समस्येचं मूळ परीक्षेमध्ये आहे. त्यामुळे ही समस्या जगाच्या शेवटपर्यंत न संपणारी आहे. म्हणजे उत्तम हस्ताक्षर असणाऱ्या डॉक्टरचे दर्शन आपल्या नशिबी नाहीच मुळी !

 

=====

=====


आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.

Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?