RBI चा सगळ्यात उत्तम गव्हर्नर कोण? रघुराम राजन की उर्जित पटेल?

रिझर्व बँक ऑफ इंडियाचं गव्हर्नर पद हे उगाचंच कुणाही व्यक्तीला उठसुठ सोपवलं जात नाही. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदी बसणाऱ्या माणसाच्या स्वाक्षरी शिवाय आपल्या नोटांना काही किंमत नसते, यावरून तुम्ही विचार करू शकता की या पदावर बसणारी व्यक्ती किती लायक असायला हवी. अगदी काहीच काळापूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या रघुराम राजन यांनी पदाचा त्याग केला आणि त्यांच्या जागी उर्जित पटेल यांची वर्णी लागली. दोन्ही व्यक्ती तोलामोलाच्या ! दोन्ही व्यक्ती आपापल्या परीने प्रत्येक क्षेत्रात उजव्या ! त्यामुळे त्यांच्यात कोण श्रेष्ठ आणि कोण कमी श्रेष्ठ असे थेट विधान करत येणार नाही. परंतु या दोन्ही महारथीं मधला फरक मात्र जाणून घेता येऊ शकतो.

raghuram-rajan-urjit-patel-marathipizza02

स्रोत

बँकिंग आणि त्याचे नियम या क्षेत्रात रघुराम राजन यांचा हात धरणारा कोणीही व्यक्ती भारतात नाही, तर चलनवाढीच्या विषयावर उर्जित पटेल यांना तोडीस तोड उत्तर देईल असा व्यक्ती देखील सध्याच्या घडीला आपल्या देशात नाही.

राजन यांनी आयआयटी दिल्ली मधून इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवले. त्यानंतर पुन्हा आयआयटी अहमदाबाद मधून त्यांनी दुसऱ्यांदा गोल्ड मेडल पटकाविले आणि इंजिनियरिंग क्षेत्र गाजवणाऱ्या रघुराम राजन यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये विद्वता मिळवत रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदाला गवसणी घातली.

=====

=====


raghuram-rajan-urjit-patel-marathipizza03

स्रोत

उर्जित पटेल यांची शैक्षणिक कारकीर्द ही अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यातच गेली. त्यांनी जगभरातील विविध विद्यापीठांमधून इकोनॉमिक्समध्ये बॅचलर्स, मास्टर्स आणि डॉक्टरेटच्या पदव्या मिळवल्या. जगभरात त्यांना Lord Of Inflation and Applied Economics अर्थात महागाई आणि व्यावहारिक अर्थशास्त्रामधील जगातील सर्वात विद्वान पंडित म्हणून ओळखले जाते.

raghuram-rajan-urjit-patel-marathipizza04

स्रोत

जेव्हा रघुराम राजन यांनी रिझर्व बँक ऑफ इंडियाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा त्यांनी एकहाती कारभार पाहण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यावरचा रोष वाढीस लागला. ते मुळातच या क्षेत्रातील विद्वान होते यात मुळीच वाद नव्हता, परंतु बँकिंग रेट्स संदर्भात सरकार आणि त्यांची वेगळी मते असल्याकारणाने त्यांच्यावर टीका देखील झाली.  आजही कोणत्याही देशाच्या आर्थिक व्यवस्थेबद्दल अचूक अंदाज बांधणारा अर्थतज्ज्ञ म्हणून ते जगभरात प्रसिद्ध आहेत.

उर्जित पटेल यांच व्यक्तिमत्त्व मात्र रघुराम राजन यांच्या उलट आहे. ते प्रसिद्धी पासून नेहमी दूर असतात. त्यांच्यातील नेतृत्वगुण इतरांनी आदर्श घ्यावे असेच आहेत. उर्जित पटेल यांचा टीमवर्क वर विश्वास आहे. ते लोकांना एकत्र घेऊन काम करतात. नोटाबंदीच्या सरकारच्या निर्णयाला देखील उर्जित पटेलांनीच प्रथम पाठींबा दर्शवला होता, हे फारच कमी लोकांना ठावूक आहे. त्यांच्या अफाट विद्वत्तेमुळे जगातील सर्वात हुशार अर्थतज्ञांमध्ये त्यांचा वरचा क्रमांक लागतो.

raghuram-rajan-urjit-patel-marathipizza05

स्रोत

=====

=====

अश्याप्रकारे या दोन्हीही व्यक्ती स्वत:च्या जागी ध्रुवासारखे अढळ पद राखून आहेत. यांच्यासारखे बँकिंग क्षेत्रातले विद्वान आपल्या भारताच्या नशिबी आले हेच आपले भाग्य होय.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.

Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?