ब्रूस ली च्या मृत्यूचे दावे; काही अविश्वसनीय तर काही विचित्र!

माणसाचा मृत्यू होणे ही तर नैसर्गिक गोष्ट! पण कधी कधी हा मृत्यू आपल्या भोवती रहस्याचे इतके दाट जाळे विणतो की ते सुटण्याचे नावचं घेत नाही. मग त्या रहस्यमयी मृत्युच्या कित्येक वर्षानंतरही चर्चा सुरु असतात. सामान्य माणसाचं सोडा त्याचा मृत्यू कसा झाला याची कोणालाही पडलेली नसते. पण त्याच्या जागी समजा एक प्रसिद्ध व्यक्ती असेल तर मात्र त्या व्यक्तीचा मृत्यू म्हणजे एक चर्चा बनून जाते जी निरंतर सुरू असते. अशीच चर्चा आजही ४४ वर्षानंतरही तशीच सुरु आहे. त्याचा मृत्य म्हणजे आजही एक नं उलगडलेलं कोडं आहे. तो प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे आपल्या सर्वांच्याच परिचयाचा लाडका मार्शल आर्टिस्ट ब्रूस ली होय.

bruce-lee-death-marathipizza

स्रोत

ब्रूस ली च्या आकस्मिक मृत्यूमुळे सर्वानाच धक्का बसला होता. त्याच्या मृत्यूबद्दलची एक गोष्ट सगळीकडे ऐकायला मिळते आणि ती गोष्ट खरी आहे हे सिद्ध करणारे पोस्टमोर्टमचे पुरावे देखील दिले जातात. Autopsy च्या अहवालानुसार, ब्रूस ली चा मृत्यू Pain Killer च्या गोळ्यांच्या अॅलर्जीमुळे झाला होता. डोकेदुखीच्या त्रासामुळे ब्रूस ली या गोळ्या घेत असे. त्याच्या पोस्टमोर्टमच्या रिपोर्टमध्ये नमूद केले होते की त्याला Celebral Edema नावाचा आजार झाला होता, ज्यामध्ये मेंदूला सूज येते.

Wikipedia सांगतं की १९७३ साली Enter The Dragon नावाच्या फिल्मची शुटींग करत असताना ब्रूस ली चा मृत्यू झाला. तेव्हा तो गोल्डन हार्वेस्ट स्टुडीयो मध्ये शूट करत असताना अचानक त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला. हॉस्पिटलला घेऊन जाता जाता त्याने प्राण सोडला.

=====

=====


bruce-lee-death-marathipizza01

स्रोत

पण सर्वात विवादात्मक कहाणी काहीतरी वेगळीच आहे. यानुसार ब्रूस ली ने एका अमेरिकन महिलेशी लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलेही होती. जेव्हा ब्रूस ली चा मृत्यू झाला तेव्हा त्याचे मृत शरीर त्याच्या अमेरिकन बायकोच्या खोलीत सापडले. अनेकांनी असाही तर्क लावला की ब्रूस ली ला त्याच्या बायकोनेच विष देऊन संपवलं होतं. पण पोलीस नोंदीनुसार तर ब्रूस ली चा मृत्यू हा आकस्मिक कारणामुळे झाला होता.

या गोष्टीला विरोध करणाऱ्या गटाचे म्हणणे आहे की ब्रूस ली च्या चाहत्यांनी शांत राहावे म्हणून पोलिसांनी मुद्दाम खोटी गोष्ट सांगितली. कारण आपल्या लाडक्या ब्रूस ली ची हत्या झाली आहे हे ऐकून त्याचे चाहते खवळले असते आणि परिस्थिती हाताबाहेर गेली असती. आता या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे ते देवच जाणो!

bruce-lee-marathipizza

स्रोत

बरं अजून एक विचित्र (हास्यास्पद) दावा केला गेला की अमेरिकेला चीनच्या या सेलिब्रिटीचे जगभरातील वाढते महत्त्व बघवत नव्हते म्हणून त्यांनी आपल्या एजंटच्या माध्यमातून ब्रूस लीचा काटा काढला आणि ही अमेरिकन एजंट दुसरी तिसरी कोणी नसून त्याची अमेरीकन बायकोच होती. ब्रूस ली ला हळूहळू विष देण्यात आले होते त्यामुळे त्याच्या शरीरातील विषाचा अंश सापडू शकला नाही असेही कित्येकांचे म्हणणे!

bruce-lee-wife-marrathipizza

स्रोत

=====

=====

या सर्व दाव्यांमध्ये कथांमध्ये किती तथ्य आहे याचा शोध आजही सुरु आहे. परंतु अवघ्या ३२ व्या वर्षी मृत्यू पाहाव्या लागणाऱ्या या जगभरातील चाहत्यांच्या या लाडक्या मार्शल आर्टिस्टचा मृत्यू हा मनाला चटका लावणारा ठरला.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.

Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?
%d bloggers like this: