लंडनच्या या बस ड्रायव्हरने लता दीदींचं गाणं गाऊन सगळ्यांनाच दिला सुखद धक्का!

लता दीदींना कोण नाही ओळखत! अख्ख्या जगामध्ये गानसम्राज्ञी म्हणून त्या सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या आवजाची जादू केवळ भारतीयांनाच नाही तर परदेशी नागरिकांना देखील तितकीच भुरळ घालते. त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने गाजवलेला तो काल आणि त्या काळातली गाणी आजही हवीहवीशी वाटतात. बॉलीवूड चित्रपटांतील कित्येक गाणी त्यांच्या गोड गळ्याने अजरामर झाली आणि त्यांची ख्याती सातासमुद्रापार गेली. आजही ती गाणी परदेशात ऐकली जातात आणि त्या गाण्यांवर तितकंच प्रेम केलं जातं हे विशेष!

लता दीदींच्या आवाजाने प्रसिद्धीला पावलेलं असंच एक गाणं म्हणजे ‘कलियों का चमन जब बनता है’ !

kaliyo-ka-chaman-marathipizza

स्रोत

या गाण्याने इतकं धुमाकूळ घातला होता की लाहोर पासून लंडन पर्यंत हे गाणं प्रत्येकाच्या ओठी होतं आणि ३६ वर्षांनी देखील त्या गाण्याची क्रेझ जराही कमी झालेली नाही हे दर्शवणारा एक प्रसंग लंडनमध्ये घडला. या प्रसंगाचे चित्रीकरण करून तो व्हिडियो युट्युबवर टाक्यात आला आणि जगभर प्रसिद्धीस पावला.

=====

=====


लंडनमध्ये एका सार्वजनिक बसमधील ड्रायव्हरने बस चालवताना अचानक लता ताईंच्या आवाजातील ‘कलियों का चमन जब बनता है’ हे गाणं गुणगुणायला सुरुवात केली. या बस चालकाला इतर साथीदारांनी वाद्यांच्या सहाय्याने साथ दिली आणि बस चालकाला अजूनच हुरूप आला. पुढील काही क्षणातचं बस मधल्या प्रवाश्यांनी देखील त्याचा आवाजाला दाद देत बसमध्येच ठेका धरला.

 

kaliyo-ka-chaman-london-bus-marathipizza

स्रोत

=====

=====

हा सर्व प्रसंग या व्हिडियोमध्ये कैद आहे

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.

Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?
%d bloggers like this: