दक्षिण आशियामधील सर्वात मोठ्या तिहार जेलबद्दल काही रंजक गोष्टी!

तिहार जेल कोणाला माहित नाही? लहानपणापासून आपण तिहार जेलचं नाव वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीवर पाहत आलोय. त्यामुळे या जेलच्या भल्या मोठ्या भिंतीआडचं जीवन नक्की कसं असेल हे जाणून घेण्याची इच्छा आपल्या सर्वांचीच आहे. या जेलमध्ये मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना, कुप्रसिद्ध व्यक्तींना डांबून ठेवतात म्हणे आणि याच गोष्टींमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला या तिहार जेलचं भारी अप्रूप! अश्या या प्रसिद्ध तिहार जेलबद्दल आम्ही आज तुम्हला काही अश्या गोष्टी सांगणार आहोत ज्या बहुतांश लोकांना माहित नाहीत. चला जास्त वेळ न लांबवता जाणून घेऊन तिहार जेलबद्दल काही रंजक गोष्टी!

तिहार जेलला तिहार आश्रम या नावाने देखील ओळखले जाते. दिल्लीच्या चाणक्यपुरीपासून ७ किमी अंतरावर तिहारा गाव स्थित आहे. तिहार जेल हे दक्षिण आशियामधील सर्वात मोठे जेल आहे हे विशेष!

tihar-jail-marathipizza01

स्रोत

तिहार जेल मध्ये कैद्यांना डांबण्याची सुरुवात १९५७ सालापासून झाली. १९८४ साली तिहार जेलच्या आसपासचा परिसर देखील तिहार जेलशी जोडण्यात आला आणि संपूर्ण कॉम्पलेक्सला ‘तिहार जेल’ असे नाव देण्यात आले.

=====

=====


सध्या तिहार जेल हे दिल्ली कारागृह डिपार्टमेंटतर्फे चालवले जाते. या कारागृहाच्या आता ९ राष्ट्रीय कारागृह आहेत आणि हे दिल्ली क्षेत्रामधील दोन कारागृहांपैकी एक आहे. दुसरे एक जिल्हा कारागृह आहे ज्याला रोहिणी कारागृह कॉम्पलेक्स म्हणून ओळखले जाते.

tihar-jail-marathipizza02

स्रोत

कधी काळी किरण बेदी यांनी तिहार जेलच्या इन्स्पेक्टर जनरल म्हणून काम पहिले होते आणि त्यांच्या काळात त्यांनी तिहार जेलचे स्वरूप आणि नशीब दोन्ही पालटले होते. त्यांनी तिहार जेलच्या आत विपश्यना करण्यास सुरुवात केली आणि त्याचे सुरुवातीचे वर्ग जी.ऐन. गोयंका यांनी घेतले होते. अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तिहार जेलमध्ये राहून एक कैद्याने आयपीएस परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली होती.

tihar-jail-marathipizza03

स्रोत

तिहार जेलमध्ये ६,२५० कैद्यांना ठेवण्याची सुविधा आहे. परंतु विद्यमान अहवालानुसार येथे जवळपास १४००० कैदी आहेत, जे अगदी दाटीवाटीने येथे आपली शिक्षा भोगत आहेत.

तिहार जेल हे कारागृह नसून ती मानवी वृत्ती बदलण्याची एक संस्था आहे असे तेथील प्रशासन सांगते. या जेलचा मुख्य उद्देश आहे कैद्यांना पुन्हा माणसात आणणे. त्यांना नव्या जीवनाची सुरुवात करण्यास प्रोत्साहन देणे. कित्येक हाय प्रोफाईल गुन्हेगारांना त्यांच्या ट्रायल दरम्यान तिहार जेलमध्ये ठेवले जाते. परंतु त्यांना वेगळी वागणूक न देता एका सामान्य कैद्याप्रमाणेच वागवले जाते. माजी केंद्रीय मंत्री ए.राजा यांना जेव्हा तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले होते तेव्हा त्यांच्या देखील कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आली नव्हती.

tihar-jail-marathipizza04स्रोत

TJ’S हा तिहार जेलचा ब्रँड आहे. या ब्रँडच्या अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या वस्तू तिहार जेलमधील कैद्यांमार्फत बनवल्या जातात. TJ’S ब्रँड अंतर्गत खाद्यपदार्थ, हँडलुम, टेक्सटाईल,फर्निचर, कपडे, बॅग, हर्बल प्रोडक्ट आणि अनेक वस्तू मिळतात.

tihar-jail-marathipizza05स्रोत

तिहार जेलमधुन देखील पलायन करण्याची योजना काही कैद्यांनी आखली होती. २०१५ मध्ये दोन कैद्यांनी रात्री भिंतीच्या खाली १० फुट सुरंग खोदली आणि त्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फोल ठरला.

तिहार जेलमध्ये जवळपास २० क्रिमिनल गँग आणि ३ लहान सहान गँग कार्यरत आहेत. या गँगचे प्रमुख असतात भयंकर गुन्हे करून आत आलेले गुन्हेगार! या गँगमुळे तिहार जेलचे प्रशासन मात्र आतून पोखरून गेले आहे. बहुतेक डॉन त्यांचा धंदा तिहारमध्ये बसून चालवतात.

tihar-jail-marathipizza06

स्रोत

=====

=====

परंतु आजही या तिहार जेलचे नाव ऐकून भल्या भल्या गुन्हेगारांना घाम फुटतो हे देखील तितकेच खरे !

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.

Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?
%d bloggers like this: