स्मार्टफोनचा कॅमेरा साफ करण्याच्या तुम्हाला माहित नसलेल्या पद्धती!

पूर्वी मोबाईलफोन फक्त कॉलिंगसाठी वापरला जायचा, म्हणजे फक्त फोन घ्यायचा किंवा गरज असेल तर दुसऱ्याला फोन करायचा. पण हळूहळू काळासोबत मोबाईल बदलत गेला. त्यात नवनवीन गोष्टींची भर पडू लागली आणि मोबाईलचा स्मार्टफोन झाला. स्मार्टफोन का? तर मनुष्याला हव्या असणाऱ्या बहुतेक सगळ्या वस्तू या स्मार्टफोनने मनुष्याच्या हातात उपलब्ध करून दिल्या. त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल कॅमेरा!

कॅमेरा नसलेला मोबाईल ही संकल्पनाच सहन करवत नाही. जीवनातले प्रत्येक आनंदी क्षण टिपण्यासाठी आणि सध्याचं सेल्फीचं खूळ सावरून घेण्यासाठी हा कॅमेरा अतिशय उपयुक्त ठरतो. आता तर इतके जास्त मेगापिक्सलवाले कॅमेरे असणारे स्मार्टफोन बाजारात आले आहेत की DSLR वगैरेची गरजच भासू नये. अश्या या बहुउपयोगी स्मार्टफोन कॅमेऱ्याची एक गोष्ट मात्र खटकते, ती म्हणजे स्मार्टफोन जसजसा जुना होत जातो, तासतास त्याचा परिणाम कॅमेऱ्यावर देखील दिसू लागतो. म्हणजे धुरकट फोटो येणे. कॅमेऱ्याच्या लेन्सवर धूळ जमा होणे त्यावर ओरखडे पडणे वगैरे वगैरे..!

camera-cleaning-method-marathipizza06

स्रोत

पण तुम्हाला माहित आहे का जर वेळोवेळी स्मार्टफोनचा कॅमेरा साफ केला तर असं होणार नाही. काय म्हणता? तुम्हाला माहित नाही स्मार्टफोनचा कॅमेरा साफ करता येतो ते? मग तर तुम्ही या पद्धती जाणून घेतल्याच पाहिजेत, ज्या सुरक्षित आहेत आणि रामबाण देखील ज्या तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटीला खराब होऊ देत नाहीत.

.
पहिली पद्धत:

camera-cleaning-method-marathipizza00

स्रोत

थोडीशी टूथपेस्ट घेऊन कॅमेऱ्याच्या लेन्सवर लावा. त्यानंतर थोडासा कापूस घेऊन ३-४ मिनिटे गोल गोल फिरवून साफ करून घ्या. त्यानंतर त्यावर एक-दोन थेंब पाणी टाकून कॉटनच्या /मऊ फडक्याने पुन्हा साफ करून घ्या.

.

दुसरी पद्धत:

camera-cleaning-method-marathipizza01

स्रोत

खोडरबर तर असेलच घरी! हा खोडरबर घ्यायचा आणि एकाच दिशेने जवळपास २-३ मिनिटे कॅमेऱ्याच्या लेन्सवर फिरवायचा मग बघा कशी सगळी घाण रबरावाटे निघून जाणून कॅमेरा कसा साफ होतो ते.

.
तिसरी पद्धत:

camera-cleaning-method-marathipizza02

स्रोत

पाण्याच्या २० थेंबांमध्ये रबिंग अल्कोहोलचा एक थेंब टाका आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण मायक्रोफाईब्र क्लॉथ वर लावून कॅमेऱ्याची लेन्स नीट स्वच्छ करून घ्या. कमीत कमी ५ वेळा केल्यास तुम्हाला कॅमेऱ्याची चकाकती लेन्स पाहायला मिळेल.

.
चौथी पद्धत:

camera-cleaning-method-marathipizza03

स्रोत

वॅसलीन देखील स्मार्टफोनचा कॅमेरा स्वच्छ करण्यामध्ये मदत करते. थोडसं वॅसलीन बोटांवर घेऊन ते कॅमेरा लेन्सच्या चारी बाजूला चोळा. त्यानंतर मायक्रोफाईब्र क्लॉथने ते पुसून घ्या.

.
पाचवी पद्धत:

camera-cleaning-method-marathipizza04

स्रोत

स्मार्टफोनच्या कॅमेरा लेन्सवर जर स्क्रेचेस पडले असतील तर अश्यावेळेस स्क्रेच रिमूव्हरचा वापर करावा. बाजारात स्क्रेच रिमूव्हर सहज उपलब्ध होईल.

.
सहावी पद्धत:

camera-cleaning-method-marathipizza05

स्रोत

मोबाईल स्क्रीनची पॉलीश देखील कॅमेरा लेन्स अतिशय उत्तमरित्या साफ करू शकते.

तर मग लागा कामाला आणि अगदी चकचकीत करून सोडा तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याला!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.

Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *