‘ये पडोसी है की मानता नही’ – राजनाथ सिंहांची top 10 विधानं

सीमाप्रश्नांवरून धुमसत असलेल्या भारत-पाक वादावर पडदा टाकण्याच्या उद्देशाने SAARC परिषदेच्या निमित्ताने भारताचे गृहमंत्री श्री राजनाथ सिंह ह्यांनी भारताकडून पुन्हा एकदा हात पुढे केला होता. पण परत पदरी निराशाच आली.

 

Saarc

 

दोन दिवसांच्या पाक दौऱ्याहून परतल्यावर राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत पाकिस्तानच्या अपमानास्पद वागणुकीचा समाचार घेतला.

त्यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे :

  • मी राज्यसभेच्या ऐक्याचं खरंच कौतुक करू इच्छितो. ह्याने देशाची आतंकवादाशी लढण्याची इच्छा किती प्रबळ आहे ते दिसून येते.

  • आतंकवादाच्या मुद्द्यावर सर्व सदस्यांनी जसे एका सुरात आपले मत मांडले हे सुद्धा कौतुकास्पद होते.

  • भारताच्या प्रत्येक पंतप्रधानाने, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत आतंकवादाशी लढण्यात कसलीही कसूर सोडली नाही. आणि हे मान्य करण्यात मला कसलीही शंका नाही.

  • हे खरंय की भारतातून आलेल्या दूरदर्शन, ANI आणि PTI च्या पत्रकारांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला होता.

  • माझ्या तिथल्या भाषणाला अंधारात ठेवण्याबाबत बोलायचं झालं तर ह्या आधीच्या सार्क परिषदेच्या वेळी काय झालं होतं ह्याबाबत मला माहिती नाहीये.

 

rajnath singh saarc marathipizza

 

  • आधीच्या सार्क परिषदेच्या वेळी काय झालं होतं ह्याबाबत मला परराष्ट्रमंत्री ह्यांच्याशी चर्चा करावी लागेल.

  • त्यांना जे हवं ते त्यांनी केलंय

  • भारतीय माध्यमांना प्रवेश आणि प्रसारण नाकारून पाकिस्तानचं चुकलं कि नाही ह्यावर मी काहीही बोलणार नाही.

  • पाकिस्तानचे मंत्री चौधरी निसार आली खान ह्यांनी सर्व सदस्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं होतं पण नंतर ते त्यांच्या कार मध्ये बसून निघून गेले. मग मी ही निघालो. मला ह्याबद्दल कसलाही आकस नाही. मी काही जेवायला गेलो नव्हतो.

  • आजपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांनी भारत-पाक समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले आणि ते सगळे फसले कारण – “ये पडोसी है कि मानता ही नही.”

पाकिस्तानची दुटप्पी वागणूक आपण सर्व जाणतोच…त्यामुळे गृहमंत्र्यांचं फ्रस्ट्रेशन आपण समजू शकतो!

फोटो आणि माहिती स्त्रोत


Copyright © 2016 मराठी pizza. All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *