पुतीनच्या मतानुसार: रशिया अर्ध्या तासाच्या आत अमेरिकेला संपवू शकते

गोष्ट आहे डिसेंबर २०११ मधली. रशियामध्ये मार्च २०१२ मध्ये निवडणुका होणार होत्या आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन, परत एकदा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या तयारीत होते. साहिजकच त्यांनी एक lavish पार्टी आयोजित केली. पार्टीमध्ये आमंत्रित होते Valdai Club Foundation ह्या रशियन think tank चे सदस्य आणि जगभरातील अनेक विचारवंत, अभ्यासक, पत्रकार इत्यादी लोक.

 

vladimir-putin-marathipizza

 

The Russia-China Axis ह्या पुस्तकाचे लेखक Douglas E. Schoen आणि Melik Kaylan म्हणतात की ती पार्टी “extravagant” होती. पार्टीचा smoked trout, veal cheeks, rhubarb sorbet, duck liver, venison soup, pear soup with caramel असा जबरदस्त menu होता. पार्टीमध्ये पुतीन अनेक विषयांवर बोलले.

जनतेचा तत्कालीन रशियन व्यवस्थेवरील अविश्वास आणि पुतीन ह्यांची अपरिहार्य, अत्यावश्यक leadership ह्या विषयावरून सुरुवात झाली. पुढे audience मधील अमेरिकन लोकांना उद्देशून ते म्हणाले, “तुम्ही नेहेमी मला विचारता की रशिया कधी बदलेल”. पण – “The ball is in your court.” – त्यांनी अमेरिकेलाच प्रतिप्रश्न केला – “Will you change?”

 

vladimir-putin2-marathipizza

 

पुतीन ह्यांनी अमेरिकेच्या missile defense system तयार करण्याच्या plan वर नाराजी व्यक्त केली. हा plan म्हणजे रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे असं त्यांचं म्हणणं होतं.

=====

=====


आणि ह्याचवेळी पुतीन म्हणाले की – अमेरिकेला रशियासोबत काही संवाद साधावा वाटण्यामागे एकच कारण आहे, ते हे, की रशिया हा एकच असा देश आहे जो अमेरिकेला अर्ध्या तासात (किंवा त्याहुनही कमी वेळात!) संपवू शकतो.

=====

=====

Schoen आणि Kaylan ह्यांचा निष्कर्ष हाच आहे की, पुतीन ह्यांची अमेरीकेबद्द्लची भूमिका ह्या वाक्यावरून स्पष्ट होते.

Sources: Business Insider India आणि Valuewalk

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.

Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ मराठी pizza

omkar has 191 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?