पुरुषांनो, ही व्हिडीयो सिरीज बघाच !

जगभरात स्त्रियांचं महत्व, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे भेडसावणाऱ्या अडचणी ह्यांवर चर्चा होत असतात.

कधी कधी गंभीर चर्चांमधून एखादी समस्या तितकीशी स्पष्टपणे व्यक्त होत नाही – जितकी विनोद-कलेच्या माध्यमातून होते.

YFilms ह्या YouTube channel ने sexism, gender discrimination ह्या समस्येवर प्रभावीपणे भाष्य करणारी एक ४ व्हिडीयोची सिरीजच काढली. थोडंसं हसवणारी, खूप विचार करायला लावणारी ही सिरीज आपण बघायलाच हवी. पुरुषांनी तर हे ४ ही व्हिडीयो नक्कीच बघायला हवेत.

=====

=====

कथेचा नायक, एक पुरुष, स्त्रियांवर जाम भडकलेला आहे. त्याला वाटतं हे जग “स्त्री” चे जरा जास्तच लाड करतं.

=====

=====


बसमधे आरक्षण, ऑफिसमधे प्रमोशन, “मा की ममता” चं कौतुक – पण “बापाची बापता” कुणी विचारतच नाही !

एक दिवस तो देवाला काहीतरी विचित्र मागून बसतो — आणि मग सुरु होतो एका मागून एक अनुभवांचा पट.

स्त्रियांना काय काय सहन करावं लागतं, हे एका पुरुषाच्या नजरेतून मांडलं गेलंय.

तुमच्यासाठी चार ही एपिसोड्स पुढे देत आहोत – नक्की बघा:

 

 

 

 

 

“स्त्री”त्व चिरायू होवो…!

Omkar Dabhadkar

Editor @ मराठी pizza

omkar has 197 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?
%d bloggers like this: