पंचामृतामधील सर्वगुणसंपन्न दुध आणि मध : आहारावर बोलू काही – भाग ४

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

===

मागील भागाची लिंक : एकशे अकरा वर्ष जुने ‘तुप’ : आहारावर बोलू काही – भाग ३

===

=====

=====


पंचामृतील शेवटच्या दोन घटकांची माहीती आज आपण घेणार आहोत. दुध व मध यांची माहीती ही भारतातील घराघरात पोहचलेलीच नव्हे तर रूजलेली आहे. त्यामुळे संक्षेप्तच माहीती घेवुया.

दुध

 

panchamrut1-marathipizza
hindupriest.us

दुधातील पोषकांश –

Calories – 62cal
Protein – 3.32gm Suger (lactose) -5.42gm
Fat – 3.35gm vitA – 2% Sodium – 41 mg
Carbs – 4.66gm Calcium – 12% Potassium – 147mg

 

दुधाचे आयुर्वेदीक महत्व

आयुर्वेदात वेगवेगळ्या प्राण्याच्या दुधाचे विविध गुण सांगितले आहेत. त्यामध्ये गायीचे दुध व आईचे दुध श्रेष्ठ सांगितले आहे.

1) गायीचे दुध मधुर रसात्मक,शीत गुणात्मक असते. यामुळे शरीरातील ओज धातुची वृद्धी होवुन सतेज कांती, ऊत्तम स्मृती व रोगप्रतिकारक्षमता वाढते.

2) म्हशीचे दुध हे पचनास जड असते, पण हे पचन संस्थेचे स्नेहन (cleansing)करते. तसेच अनिद्रे( insomnia) तही ऊपयुक्त ठरते.

3) ऊंटाचे दुध हे रूक्ष गुणात्मक असुन आध्मान (bloating), शोथ(oedema-सुज), मुळव्याध, जलोदर या व्याधीत ऊपयुक्त ठरते. वातजन्य व्याधी व कफ जन्य व्याधीत ऊपयुक्त ठरते.

4) बकरीचे दुध हे ऊत्तम शोषक (absorbent), पचनास हलकेअसते. रक्तजन्य व्याधी, ज्वरात अत्यंत उपयुक्त ठरते. डांग्याखोकला, दमा या व्याधीत देऊ नये.

5) आईचे दुध हे सर्वगुणसंपन्न व सर्वात पोषक आहे. शिशुच्या पोषणासाठी तर ते ऊत्तम आहेच, पण नेत्रशुल (डोळे दुखणे), Haemothermia यातही ते ऊपयुक्त आहे.

 

मध

honey-marathipizza
myupchar.com

आयुर्वेदानुसार मध  4 हे प्रकारचे असुन त्यात माक्षिका मधु (मध) उत्तम व औषधी आहे. त्याचे स्वरूप तेलाप्रमाणे सांगितले आहे.

1) मध हा लेखणिय द्रव्य आहे. हा शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतो.

=====

=====

2) शरीरातील पित्तदोषाचे व शरीराचे शोधन करते.

3) “योगवाहि”हा मधाचा गुण सांगितला आहे. म्हणजेच मध catalyst प्रमाणे कार्य करतो.

अशा प्रकारे पंचामृतातील प्रत्येक घटक हा लाभदायक आहे व पंचामृतात तो समप्रमाणात घेतलेला असतो. पंचामृताचे विशेष ऊपयोग पुढीलप्रमाणे :

1) त्वचा सतेज राहते.

2)बुद्धीवर्धक आहे.

3) मन प्रसन्न राहते.

4) एकाग्रता वाढते.

5) गांभीर्याने याचे नित्य सेवन केल्यास सुदृढ व बुद्धिमान संतती होते.

MarathiPizza.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. MarathiPizza.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?