टोरंट वापरणाऱ्यांच्या आनंदाला उधाण; Kickass Torrents पुन्हा सुरु झालंय !

रजनीकांतचा कबाली Kickass Torrents वर लिक झाला आणि सगळ्यांच्या आवडत्या आणि विश्वसनीय टोरंट वेबसाईटने आपल्या लाडक्या चाहत्यांचा निरोप घेतला. रजनीकांतशी पंगा घेतला म्हणून हे दिवस या लाडक्या टोरंट साईटला बघावे लागले असे म्हणत जगभर तिची खिल्ली उडवली गेली. तिचे लाडके चाहते देखील गपगुमान बसून सारं काही निमुटपणे ऐकत होते. पण आता चाहत्यांमध्ये जल्लोष सुरु झालायं. अहो, कारण Kickass Torrents चा पुनर्जन्म झालाय. राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे Kickass Torrents पुन्हा सज्ज झालंय Torrent pirates community  मध्ये धमाका करायला !

kickass-torrent-is-back-marathipizza01

स्रोत

katcr.co या नव्या लिंकवर Kickass Torrents आपल्या चाहत्यांच्या सेवेत पुन्हा रुजू झालंय ! पूर्वीच्या Kat.cr वेबसाईट सारखाच या नव्या वेबसाईटचा लुक ठेवण्यात आला आहे.  Kickass Torrents च्या प्रतिनिधीने याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की,

मूळ Kat साईटच्या अॅडमीन्स आणि क्र्यूने या नव्या सुरुवातीमध्ये आम्हाला पुन्हा एकदा साथ दिली आहे. यावरून लोकांचे आमच्यावर असलेले प्रेम त्यांची आमच्या साईटवर असणारी निष्ठा, बांधिलकी दिसून येत आहे. त्याबद्दल आम्ही सर्वांचेच आभारी आहोत.

वेबसाईट एकदम नव्या युजर्स डेटाबेसस परत आली आहे. मूळ Kat साईटमधील काही प्रसिद्ध uploaders ज्यांच्यावर  pirate community चा विश्वास आहे ते देखील नव्या वेबसाईटशी जोडले गेले आहेत. काहीच दिवसांत वेबसाईट संपूर्ण नवीन कंटेंटसह भरली जाईल अशी आशा आहे.

ही बातमी पसरताच जगभरातील चाहत्यांनी नव्या katcr.co वर अक्षरश: उड्या मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वेबसाईट ओपन होण्यास बराचसा वेळ लगत आहे. तसेच स्लो नेट कनेक्शनमुळे वेबसाईट ओपन न होण्याची देखील शक्यता आहे. परंतु येत्या दोन-तीन दिवसांत ही समस्या देखील दूर होईल आणि Kickass Torrents चे चाहते पुन्हा एकदा आपल्या आवडत्या टोरंट वेबसाईटचा लाभ घेऊ शकतील.

kickass-torrent-is-back-marathipizza02

स्रोत

या बातमीमुळे Torrent pirates च्या आर्मीमध्ये नवसंजीवनी जागृत झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.

Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *