वृंदावनमधे उभं रहातंय जगातील सर्व धार्मिक स्थळांहून उंच मंदिर!

आत्तापर्यंत आपण अनेक उंच इमारती , मनोरे इत्यादी गोष्टींबद्दल बऱ्याचदा वाचलं, ऐकलं आहे. Eiffel tower, Burj Khalifa ह्या उंच वास्तू जगप्रसिद्ध आहेत.

भारतात देखील उंच इमारती आहेतच…आपण कुतुब मिनार जाणतोच. मुंबईतील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, गुजरातमधील प्रस्तावित सरदार प्रकल्प…हे ही आपण जाणतो.

पण आपल्याला हे माहिती नसेल – की – आता वृंदावनमधे असं मंदिर बांधलं जातंय, जे जगातील सर्वात उंच प्रार्थनास्थळअसेल!

हे श्रीकृष्ण मंदिर असणार असून मंदिराचं नाव आहे – चन्द्रोदय मंदिर.

 

chandroday-mandir_marathi-pizza
इंटरनेशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियेसनेस (इस्कॉन), बेंगळुरू मधील भक्तांनी २००६ मध्ये एक स्वप्नं पाहिलं आणि तब्बल ८ वर्षाच्या तयारीनंतर २०१४ मध्ये ह्या मंदिराची पायाभरणी झाली.

हे मंदिर कुतुब  मिनार पेक्षा तिप्पट उंच असणार आहे आणि त्याचा पाया हा जगभरातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा ( दुबई) पेक्षा तिप्पट खोल असणार आहे.

=====

=====


मंदिर उभारणीचा अपेक्षित खर्च आहे तब्बल ७०० कोटी!

मंदिराची उंची ७०० फूट असणार आहे, ज्यामुळे पूर्ण झाल्यावर हे मंदिर जगभरातील सर्व प्रार्थनास्थानांपैकी सर्वात उंच प्रार्थनास्थळ असणार आहे.

मंदिर नुसतंच उंच नसून कलाकृतीमध्येही अतिशय सुंदर असणार आहे.

२६ एकर परिसरात १२ कृत्रिम वन बनवण्यात येणार आहेत…!

हे १२ वन कृष्ण साहित्यामधील वर्णनाप्रमाणे बनवण्यात येणार आहेत.

chandroday-1_marathi-pizza

 

मंदिरात एकूण ५११ खांब असतील तर पूर्ण मंदिराचं वजन ५ लाख टन एवढं असणार आहे.

मंदिरात कितीतरी high speed lifts असणार आहे आणि विशेष म्हणजे –

कितीही मोठं वादळ आलं तरी ह्या मंदिराला आणि lifts ला काहीही इजा पोहोचणार नाही असं ह्या मंदिराचं वास्तुशिल्प असणार आहे.

परंपरागत द्रविड आणि नागर शैली मध्ये मंदिराची रचना असेल.

 

view_marathi-pizza

 

मंदिराचं बांधकाम अंदाजे २०२२ मध्ये पूर्ण होईल.

सध्या इथे मंदिराच्या उभारणीसाठी जवळपास ३००० लोक काम करत आहेत.

मंदिर पूर्ण झाल्यावर भक्तांना अगदी पुरातन काळातील वृंदावन मध्ये आल्यासारखं वाटलं पाहिजे असा पूर्ण प्रयत्न आहे.

=====

=====

मंदिराच्या सगळ्यात वरील मजल्याचे नाव “ब्रज मंडल दर्शन” ठेवण्यात येणार असून, इथून दुर्बिणीच्या साहाय्याने तुम्ही ताज-महाल आणि ब्रज (म्हणजे वृंदावनच्या आसपासचा भव्य परिसर) मधील ७६ धार्मिक स्थळे बघू शकाल.

मंदिराच्या भव्यतेची कल्पना यायला हवी असेल तर –

पूर्ण मंदिर बघण्यास भक्तांना ३-४ दिवस लागणार आहेत!

Source : amarujala


Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

असेच छानसे लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 34 posts and counting.See all posts by abhijit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?