ही अफवा आहे: कारच्या A/C मुळे तुम्हाला cancer होऊ शकतो!

इंटरनेटवरील विवीध माहितीच्या आधारावर आम्ही पब्लिश केलेल्या मूळ आर्टिकलमध्ये हे सांगितल्या गेलं होतं की कारच्या AC मुळे cancer होण्याचा धोका असतो. पण एका जागरूक वाचकाने फेसबुकद्वारे आमच्या निदर्शनास आणून दिल्या प्रमाणे – ही केवळ एक अफवा आहे. त्यामुळे आम्ही मूळ लेखाचं हेडिंग बदलून, लेखाच्या आधी हे disclaimer जोडत आहोत. अशी माहिती विवीध सोर्सेसवर उपलब्ध आहे.

अर्थात, पुढील मूळ लेखात सांगितल्याप्रमाणे कार सुरु केल्यावर काहीवेळ खिडक्या उघड्या ठेऊन फ्रेश हवा कारमध्ये येऊ देणं केव्हाही चांगलंच. पण “cancer टाळण्यासाठी” वगेरे ते करण्याची गरज नाही.

मूळ आर्टिकल :

===

रस्त्यावरचा high noise आणि हवेचं प्रदूषण ह्या दोन्ही कारणांमुळे आपल्यापैकी बरेच लोक कारच्या खिडक्या बंद करून, AC सुरु करून मगच कार सुरु करतात.

कारमध्ये बसल्यावर, काहीही विचार नं करता आपण बिनधास्त A/C चालू करतो आणि drive करायला लागतो. पण हे करत असताना आपण नकळत आपली आणि car मध्ये आपल्यासोबत बसलेल्यांची health बिघडवतोय हे तुम्हाला माहित आहे का?

 

car AC marathipizza

Image source: driving.ca

आपण गाडी पार्क करताना आपल्या कारच्या सगळ्या windows बंद करतो. त्यामुळे कारमध्ये ४००-८०० mg benzene जमा झालेला असतो. जर तुमची कार ओपन parking किंवा उन्हामध्ये पार्क केलेली असेल तर जवळपास २०००-४००० mg एवढा benzene त्यामध्ये जमा होतो.

जेव्हा आपण car चा A /C चालू करतो तेव्हा सगळ्यात आधी तो गरम हवा बाहेर फेकतो – ज्याद्वारे हा benzene कार मध्ये पसरतो आणि श्वासावाटे तो आपल्या शरीरात जातो.

Benzene हे आपल्या kidney, liver आणि bone tissues साठी अतिशय घातक असतं. आपल्या शरीराला benzene चा निचरा करण्यासाठी खूप वेळ लागतो. तोपर्यंत त्याने शरीरात damage करायला सुरुवात केलेली असते – ज्यामुळे cancer सारखा भयंकर आजार होऊ शकतो.

मग हा धोका कसा टाळाल?

सोपी युक्ती आहे – ह्यापुढे जेव्हा कारमधून प्रवास करणार असाल, तेव्हा कार सुरु करा, A/C चालू करून थोड्या वेळ windows down ठेवा – खिडक्या A/C सुरु असताना उघड्या ठेव्या. ५-७ मिनिटात benzene बाहेर निघून जाईल, मग खिडक्या बंद करून घ्या आणि आरोग्यपूर्ण प्रवासाचा आनंद लुटा. 🙂

===

परत एकदा — वरील बातमी ही अफवा आहे ! 🙂

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *