मृत्युनंतर बिल गेट्स जे काही करणार आहे ते प्रत्येक श्रीमंताला विचार करायला लावणारं आहे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

===

माणूस पैसा का कमावतो? हा प्रश्न विचारल्यावर आपलं सरळ सरळ उत्तर असेल स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी ! जीवन आनंदाने जगता यावं, दोन सुखाचे क्षण आपल्याही मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवावे यासाठी माणसाची आयुष्यभर धडपड चाललेली असते. आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल असावे याच हेतूने आपण पैसा साठवतो. प्रत्येकजण आपआपल्या सोयीनुसार स्वत:ची संपत्ती निर्माण करतो. कोणी बँकेत सेविंग्ज करतो, कोणी इन्व्हेस्टमेंट करतो, कोणी प्रोपर्टी विकत घेतो. एकंदर काय तर आपल्याला सुखाने जगायचयं सुखाने मरायचयं!

बिल गेट्स तर तुम्हाला सगळ्यांना ठावूक असेलचं. जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि गडगंज संपत्तीचा मालक ! असं म्हणतात की त्याची सर्व संपत्ती जर पैश्यामध्ये बदलली तर पृथ्वीपासून चंद्रापर्यंत अवकाशात रस्ता बांधता येईल. ऑक्टोंबर २०१६ पर्यत बिल गेट्सची संपत्ती होती तब्बल ८१.७ बिलियन डॉलर! म्हणजे भारतीय रुपयांमध्ये मोजायचे झाल्यास ५,४५,७९१ करोड रुपये ! रोज लाखो खर्ची केले तरी त्याची संपत्ती काही संपणारी नाही, कारण त्यात दर दिवसाला करोडोच्या संपत्तीची भर पडत असते. तुम्हाला काय वाटतं, त्याने काय विचार केला असेल आपल्या एवढ्या संपत्तीबद्दल?

=====

=====


fhi.ox.ac.uk

एका मुलाखतीमध्ये हाच प्रश्न बिल गेट्सला विचारण्यात आला आणि त्याने उत्तर दिले

मला माझी संपत्ती दान करायची आहे. मी माझ्या मुलांसाठी एक लहानशी रक्कम बाजूला करून ठेवलेली आहे.  त्या व्यतिरिक्त त्यांच्या नावावर एक रुपयाही नाही. मला वाटतं की त्यांनी स्वत:च्या हिमतीवर मोठ व्हावं आणि माझा मान वाढवावा.”

=====

=====

आणि मुख्य म्हणजे बिल गेट्सच्या तिन्ही मुलांना वडीलांच्या या निर्णयाचा अभिमान आहे. एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक असून देखील बिल गेट्स आणि त्यांच्या कुटुंबियांना एका पैश्याचाही गर्व नाही हे विशेष!

bill-gates-wealth-marathipizza02
billgatesandfriends.com

बिल गेट्स काही जन्मत: श्रीमंत नव्हता, तर त्याच्या मेहनतीने आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमुळे तो श्रीमंत झाला. आपली वाढती संपत्ती पडून आहे हे बिल गेट्सला आवडत नसे. म्हणून त्याने हाच पैसा समाजकार्यात गुंतवण्याच्या उद्देशाने २००० साली  Bill and Melinda Gates Foundation ची स्थापना केली. ६० वर्षीय बिल गेट्सने आपल्या संपत्तीपैकी बराचसा हिस्सा या फौंडेशनच्या माध्यमातून दान केला आहे. मे २०१३ मध्ये बिल गेट्सने फौंडेशनच्या माध्यमातून गरजू लोकांच्या मदतीसाठी तब्बल २८ बिलियन डॉलर दान केले होते. बिल गेट्सच्या या दानशूर वृत्तीने इतर श्रीमंत हस्तींना देखील प्रेरित केलं आणि ते देखील या समाजकार्यात आपला सक्रीय सहभाग दर्शवत आहेत.

bill-gates-wealth-marathipizza03
onecoastmagazine.com

अश्या या दानशूर बिल गेट्सची संपत्ती कधीतरी संपेल, पण त्याने केलेलं कार्य त्याचे नाव या जगात त्याशेवटपर्यंत राखेल हे मात्र नक्की!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?
%d bloggers like this: