डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : ‘अतीसामान्य ते असामान्य’ प्रवासाचा यात्री !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

===

भारताचे 11 वे राष्ट्रपती हे कोणीतरी तर बनणारच होते, म्हणून ‘झालेले’ किंवा ‘कोणीतरी नामधारी म्हणून बनवलेलेे’ असे परंपरागत नव्हे; तर आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत लोकांसाठी जगुन लोकांचेच बनुन राहिलेले असे एक व्यक्तिमव होते कारण ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम होते.

apj-abdul-kalam-marathipizza01
intoday.in

एका बाजूला शांततेसाठी तरीही शत्रुच्या मनात धडकी भरवणारी पोखरण अणुचाचणी होती तर दूसरीकड़े “when there is order in the nation then, there is peace in the world”, म्हणत यूरोपियन देशांच्या संसदेत केलेल्या सर्वकालीन सर्वश्रेष्ठ भाषणांपैकी एक असे जागतिक शांततेचे आवाहन करणारे भाषण होते. E.U.ची संपूर्ण संसद जेंव्हा आनंदाने भारावलेल्या अवस्थेत, बराच वेळ टाळ्या पिटत असतांनाच उभी राहुन मानवंदना देते होती तेव्हा, “भारताकडुन शांततेचा जगाला दिला जाणारा संदेश व न्युक्लीअर टेस्ट ह्या दोन्ही परस्पर विरोधाभास असणाऱ्या गोष्टी आहेत”,असे ओरडणाऱ्या पाकिस्तानला आपोआप उत्तर मिळाले. ह्या प्रसंगातुन एका शांततावाद्याची विविध देशांच्या प्रतिनीधी मनावर, जादु करणाऱ्या वक्तृत्वाची झलकही दिसली व strength respects strength only, ह्या वाक्याचा अर्थही कळाला.

=====

=====


पेपर वाटण्यापासून खडतर आयुष्याची सुरवात करणाऱ्या एका व्यक्तिवर जेव्हा जगातील लहानमोठ्या सर्व पेपर्समधे स्तुती करणारे रकानेच्या रकाने लिहुन येतात तेंव्हा ‘अतीसामान्य ते असामान्य’ ह्या प्रवासाचे ते एक उदाहरण ठरते.

अनेक मार्गदर्शक पुस्तकांतुन आशावादी लिखाण करुन जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी व युवकांना सत्य, विकास, नीतिमत्ता व राष्ट्रनिर्माणाचा मार्ग दादाखवणाऱ्या ह्या महापुरुषाचा जन्मदिन 15 ऑक्टोबर हा विश्व विद्यार्थी दिवस म्हणुन साजरा केला जातो तो ह्यासाठीच.

apj-abdul-kalam-marathipizza02
ibnlive.in

एकदा डॉ.साहेब मिसाईल चाचणीत इतके रममाण झाले की, स्वतःच्या भाचीचेही लग्न विसरून गेले. कधी शाळेत जेवणाच्या पंगतीत आनंदाने लहान मुलांना वाढणे, तर कधी आपली खुर्ची इतरांपेक्षा वेगळी आहे हे आढ़ळल्याने ‘मलाही साधीच खुर्ची द्या’ म्हणत बड़ेजाव टाळणे, अगदी 2012 ला देशाच्या सर्वोच्च पदाच्या निवडणुकीत ‘राष्ट्रपती पदाबाबत राजकारण होणे योग्य नसुन सर्वसंमती असेल तरच मी उभा राहील’ म्हणत राष्ट्रपतीपदावर सुद्धा पाणी सोडणे, वयाच्या 83 व्या वर्षीही युथ आयकॉन असणे किंवा राष्ट्रप्रमुख असतांनाही आपल्यात एक कॉमन मॅन जपणे, असे कितीतरी पैलु आपल्याला डॉ. कलामांनी आधुनिक काळातही एका साधुप्रमाणे निर्मोही आयुष्य व्यतीत केल्याचे दाखले देतात.

जगातील सर्वश्रेष्ठ संशोधकांपेेकी एक असूनही शिक्षणाचे महत्व ओळखून आपली ओळख केवळ एक शिक्षकाची रहावी, कारण ‘शिक्षकांची राष्ट्रनिर्माणातील भूमिका अतुलनीय असते’, असे म्हणत ज्ञानदानाच्या पवित्रकार्याचा केलेला योग्य असा गौरव करणे असो, नातलग दिल्लीला आल्यावर स्वतःच्या खिशातुन केलेला त्यांच्यावरचा खर्च असो किंवा कायम गरजु संस्थाना केलेले आपल्या मासिक मानधनाचे वाटप असो, ही उदाहरणे अगदी सहज सांगतात की, ह्या आदर्श व्यक्तिमत्वाची, ट्रक भरून असणारी एकमेव संपत्ती म्हणजे पुस्तके का होती?

apj-abdul-kalam-marathipizza03
ibnlive.in

एकीकडे “स्वप्न म्हणजे ते नाही जे तुम्हाला झोपेत पड़ते, स्वप्न म्हणजे ते जे तुम्हाला झोपुच देत नाही” म्हणणारे राष्ट्रसमर्पित व्यक्तिमव तर दुसरीकडे, ‘low aim is a crime, स्वप्ने मोठीच बघा आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा’ म्हणणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्व.

=====

=====

‘नि:संशय देशाने सर्वाधीक प्रेम केलेला राष्ट्रपती’ अशी ओळख असणाऱ्या ह्या मिसाईल मॅन च्या आठवणी जनतेच्या मनात कायमच राहतील ह्यावर कोणाचेही दुमत असु शकत नाही.

‘मी मरेन त्या दिवसाला सुट्टी जाहिर करु नका तर एक दिवस जास्त काम करा’ म्हणत always nation first हा त्यांच्याच संदेश अंगीकारुन आधुनिक स्वप्नातिल भारताचे निर्माण करु शकतो.

भारताच्या ह्या थोर सुपुत्रास  वाहिलेली श्रद्धांजली.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

One thought on “डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : ‘अतीसामान्य ते असामान्य’ प्रवासाचा यात्री !

  • July 28, 2017 at 10:29 pm
    Permalink

    Keep on writing

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?