सत्यवान-सावित्री कथेचा एक कधीही नं वाचलेला दृष्टीकोण

सती सावित्रीची कथा आपण सर्व जाणतोच.

‘सवित्र’च्या म्हणजेच सूर्याच्या आशीर्वादाने नि:पुत्र अश्वपतीला झालेली तेजस्वी पुत्री म्हणजे सावित्री!

पती सत्यवानाच्या मृत्यूने दुःखी झालेली सावित्री, स्वतःच्या ज्ञानाच्या, प्रतिभेच्या बळावर साक्षात यमाकडून आपल्या पतीचं जीवन परत मिळवते.

 

savitri marathipizza 00

स्त्रोत

=====

=====


आपण अनेकदा ही कथा वाचतो, ऐकतो आणि विसरून जातो. त्यातून काही शिकतोच, असं नाही.

श्री बाळकृष्ण प्रधान ह्यांनी त्यांच्या फेसबुक स्टेटस आणि कमेंटमधे सावित्री आख्यानाचा एक आगळावेगळा दृष्टीकोण उलगडून दाखवलाय. मराठी pizza तर्फे, त्यांचा हा सकारात्मक दृष्टीकोण तुम्हा सर्वांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत.

ते म्हणतात :

===

ज्या देशांत सावित्री झाली त्या देशांत “मुलगाच झाला पाहिजे” म्हणून स्त्री भ्रूणुहत्या होते या गोष्टीचं मला राहुन राहुन आश्चर्य वाटतं.

सावित्रीचं आख्यान वाचताना खालील गोष्टी दिसून आल्या.

 

1. अश्वपती राजाला मूल नव्हतं. त्याने तप करून सूर्याला प्रसन्न करून घेतलं. सूर्याने त्याला गुणी मुलगी होईल असा वर दिला.

अश्वपतीने  “मला मुलगाच होऊ दे” असा हट्ट धरला नाही…!

 

2. सावित्री अतिशय गुणी आणि बुद्धिमान मुलगी होती. तिच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर राजाचा विश्वास होता.

त्याने तिला योग्य “वर” निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं…!

 

savitri marathipizza 03

 

3. त्या काळांतील अनेक राजपुत्र पाहिल्यावर तिने सत्यवानाची निवड केली. सत्यवान गुणी असला तरी त्याच्या वडिलांचं राज्य गेलं होतं आणि त्यांच्याबरोबर तो अरण्यांत रहात होता. त्याच्या वडिलांची दृष्टीही गेलेली होती.

 

4. नारद मुनींनी, सत्यवान गुणी मुलगा असला तरी त्याला एकच वर्ष आयुष्य आहे असं सांगितलं.

तरी सावित्री आपल्या निर्णयावर स्थिर होती.

 

savitri marathipizza 02

स्त्रोत

5. विवाहा नंतर ती अरण्यांत राहू लागली.

“माझ्या वडिलांच्या राज्यात किती वैभव आहे…नाहीतर तुम्ही…!” – अशा गोष्टी तिने केल्या नाहीत.

 

6. सत्यवानाला नेण्यास आलेल्या यमाशी तिचा झालेला संवाद वाचनीय आहे.

तो वाचला म्हणजे ती बहुशृत होती, तिला वेद उपनिषदांचं ज्ञान होतं, असं दिसून येतं.

 

savitri marathipizza 01

=====

=====

स्त्रोत

7. यमाला प्रसन्न करुन तिने आपल्या वडिलांना मुलगे होण्याचा वर मागितला, सासऱ्यासाठी दृष्टी आणि गेलेले राज्य परत मिळवण्याचा वर मागितला. सत्यवानाचे प्राण परत मागितले.

कोणत्याही मुलाने केलं नसतं असं दोन्ही कुळांचं कल्याण , तिने आपल्या पुण्याईने व बुद्धिचातुर्याने केलं…!

 

कुळाची कीर्ती होण्यासाठी आणि उद्धार होण्यासाठी “मुलगाच असला पाहिजे” असं नाही – हेच सावित्रीच्या आख्यानातून शास्त्रकारान्नी दाखवून दिलं आहे.

===

“पुराणातली वानगी पुराणात” असं आपल्याकडे म्हटलं जातं. पण ह्या कथांमधील वानग्या आज देखील किती valid, दिशादर्शक आहेत, हेच वरील मुद्द्यांवरून दिसून येतं…!

Copyright © 2016 मराठी pizza. All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ मराठी pizza

omkar has 184 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?